क्रिकेट, पैसा, करमणूक आणि वाद म्हणजेच 'आयपीएल' अर्थात इंडियन प्रीमियर
लीग असे जणू समीकरणच तयार झाले आहे. वादांच्या भोवर्यात गंटागळ्या खात
असली तरी आयपीएल ही भारतीय क्रिक्रेट नियामक मंडळसाठी (बीसीसीआय) सोन्याची
अंडी देणारी कोंबडी ठरली आहे. आयपीएलच्या धर्तीवर अनेक देशांनी लीगचे आयोजन
केले खरे, परंतु त्या स्पर्धांना आयपीएलएवढा पैसा व प्रसिद्धी मिळवता आली
नाही. मात्र, खेळापेक्षा वादच जास्त चर्चेत आल्यामुळे काही वर्षांपासून
आयपीएलची प्रसिद्धीही कमी झाली आहे. कारण, मागील सात-आठ
वर्षांत क्रिकेटर रसिकांना आयपीएलमध्ये वादाशिवाय दुसरे काहीच पाहायला
मिळालेले नाही.
खरं तर गुणवान क्रिकेटपटूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या कल्पनेतून आयपीएलचा जन्म झाला. मात्र, ही क्रिकेट स्पर्धा कायमच वादग्रस्तच राहिली आहे. मॅच फिक्सिंग असो वा क्रिकेटपटूंचे गैरवर्तन व नियमांचे पालन न केल्याने काही संघ व क्रिकेटपटूंवर करण्यात आलेली कारवाई, अशा एक ना अनेक वादांच्या भोवर्यांत आयपीएल गंटागळ्या खात आहे. असे असले तरी नव्या संघासाठी देशातील 10 उद्योजकांनी उत्सुकता दर्शवली आहे. दोन नव्या संघांसाठी येत्या 9 डिसेंबर (बुधवार) थेट बोली लावण्याची संधी देण्यात येणार आहे. 2013 मधील स्पॉट फेक्सिंग व सट्टेबाजी प्रकरणात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. 2018 मध्ये दोन्ही संघ आयपीएलमध्ये पुन्हा पुनरागमन करतील.
चेन्नईच्या चेट्टीनाड व आयटीडब्ल्यू या दोन उद्योग समुहासह रॉन स्क्रूवाल्याचा यूनिलेझर, व्हिडिओकॉन, ग्रुप एम, इंटेक्स मोबाइल, हल्दीराम व यस बँक यांनी बीसीसीआयकडून निविदा खरेदी केल्या आहेत. आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका व त्यांचे बंधु संजीव गोयंका यांनी देखील वेगवेगळी निविदा दाखल करणार आहे. त्यामुळे अखेर कोणत्या समुहाचे संघ आयपीएलमध्ये खेळतील, हे पाहाणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
आयपीएलचा लिलाव, अमूक संघात कोणता क्रिकेटपटू आहे. टमूक संघाने कोणत्या विदेशी क्रिकेटपटूला खरेदी केले आहे, याची जेवढी ओढ, उत्सुकता आधी होती, आता मात्र ती फारच कमी झाली आहे. लोकांना आयपीएलचा पार कंटाळा आला आहे. परिणामी खास आयपीएलसाठी मैदानात येणार्या क्रिकेटप्रेमींची संख्याही चांगलीच रोडावली झाली आहे. त्यामुळे आयपीएल ही कोंबडी भविष्यातही सोन्याची अंडी देत राहील का? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.....