योग आपल्या अध्यात्मिक व सेक्स जीवनात संतुलन निर्माण करण्याचे कार्य करत असते. 'योग' या शब्दाचा अर्थ 'जोडणे' अथवा 'मीलन' असा आहे. शरीर व आत्मा यांना योगाच्या माध्यमातून एक विशिष्ट आकार दिला जातो. संभोग करतांना दोन जीवांमध्ये एकाग्रता निर्माण करून त्याचे रूपांतर समाधीमध्ये करण्याचे सामर्थ्य योगामध्ये असते. परंतु, आपले शरीर अस्वच्छ असेल तर आपल्याला हा आनंद उपभोगण्यासाठी वाट पाहावी लागेल.
योगशास्त्रात विविध आसने सांगितले असून प्रत्येक आसनात विशिष्ट प्रकारचे गुण आहेत. संभोगात एकाग्रता मिळविण्यासाठी पद्मासन अधिक फायदेशीर ठरते. आपण व आपल्या जोडीदारात एकमेंकाविषयी आपुलकी निर्माण करण्याचे काम पद्मासन करत असते. सेक्स करताना आपले मन स्थिर राहणे आवश्यक असते. चित्त थार्यावर राहण्यासाठी ध्यानमुद्राद्वारे केले जाणारे पद्मासन अधिक फायदेशीर असते. समागमात एकाग्रता निर्माण झाल्यानंतर सेक्सचा मनमुराद आनंद आपण लुटू शकता.
पद्मासन केल्याने हाता-पायांच्या सांध्यांमध्ये, मांसपेशींमध्ये ताण निर्माण होत असतो. त्यामुळे स्नायू बळकट होतात. तसेच पोट व मुत्राशयाचे आजारही दूर होतात. शारिरीक व्याधी दूर झाल्याने शरीरात विशिष्ट उत्तेजना संचारते व संभोगक्रियेसाठी ही उत्तेजना आपल्या आनंदात नक्कीच भर घालणारी असते.
'पद्मासन' कसे कराल? एकाग्रचित्त राहण्यासाठी केल्या जाणार्या आसनांमध्ये पद्मासन हे महत्त्वाचे आसन आहे. पद्म म्हणजे कमळ, म्हणून या आसनाला कमलासनही असेही म्हणतात.
कृती : हे आसन बसून केले जाते. आधी पाय लांब करून बसा. उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरून डाव्या पायाला उजव्या पायाच्या जांघेवर ठेवा. नंतर उजवा पाय डाव्या जांघेवर ठेवा. दोन्ही हाताचे पंजे गुडघ्यांवर सरळ ठेवा. दोनही हाताचे अंगठ्याजवळील बोट अंगठ्यावर ठेवा. बाकी तिन्ही बोटे सरळ ठेवा. डोळे बंद करा. पाठ ताठ ठेवून बसा. पद्मासनाला सर्व दुर्भावनांचा विनाशक म्हटले जाते.
पद्मासनाचे फायदे : 'इंद पद्मासन प्रोक्तंसर्वव्याधी विनाशनम्' -म्हणजेच पद्मासन सर्व व्याधींचा नाश करते. सर्व व्याधी म्हणजेच शारीरिक, दैविक आणि भौतिक व्याधी.
पद्मासन केल्याने साधक किंवा रोग्याचे चित्त शांत होण्यास मदत होते. साधना आणि ध्यान करण्यासाठी हे आसन उत्कृष्ट आहे. याने चित्त एकाग्रीत होते आणि एकाग्रचित्ताने धारणा सिद्ध करता येते.
घ्यावयाची काळजी : ज्यांचे पाय अती प्रमाणात दुखत असतील त्यांनी हे आसन करू नये.

No comments:
Post a Comment